Nanded Crime : चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, मृतदेह ४ दिवसांपासून शवागृहात

Nanded : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 

या घटनेप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणीच्या नातेवाईकांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचरादरम्यान एका तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू चूकीचे इंजेक्शन दिल्यानेच झाल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्रजापती लांडगे अस या तरुणीचे नाव आहे. ती नर्सिंग कॉलेज मध्ये प्रथम वर्षात शिकत होती. १८ मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली.

त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, १९ मे रोजी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत....

सबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तरुणीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. मागील ४ दिवसांपासून तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात आहे. आज तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रजापती लांडगे हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दखल करण्याची मागणी केला आहे. मुलीच्या मृत्युने लांडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply