Nana Patole : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल; नाना पटोलेंचे वक्तव्य

Nana Patole : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातील तिढा येत्या दोन-चार दिवसात सुटेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील जागावाटपावरून अनेक दावे-प्रतीदावे केल्या जात होते. शिवाय, जागावाटपासंदर्भात काल, 22 फेब्रुवारीला होणारी बैठक आता थेट 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं जातंय.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 'या' दिवशी होऊ शकतं जाहीर, जाणून घ्या किती टप्प्यात होऊ शकतं मतदान

त्यामुळे मागील महिन्यात एकामागे एक होणाऱ्या बैठकांना कुठेतरी या महिन्यात ब्रेक लागल्याचे चित्र आहे. एकीकडे जागावाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतेय, तर काही जागांसाठी मविआमध्ये अजूनही भिजत घोंगडे आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी भाष्य करत 11 ते 12 जागा आम्ही लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांना विचारले असता,  शरद पवार साहेब काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र येत्या दोन ते चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटप होऊन सर्व चित्र स्पष्ट होईल, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply