Nagpur RTO : कामाचा 'ओव्हरलोड ! नागपूरला मिळेना पूर्णवेळ ‘आरटीओ’, नागपूर व अमरावती विभागाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे

Nagpur RTO : गेल्या सहा महिन्यांपासून अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांच्याकडे नागपूर विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे शहर असताना कार्यालयाला आरटीओ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)चा सर्व कारभार गेल्या सहा महिन्यांपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भरोशावर आहे. शहर, ग्रामीण व पूर्व नागपूर कार्यालय अतिशय महत्त्वाची मानली जातात. गाड्यांच्या वाहनांची वाढती संख्या, परवाना व इतर वाहनासंदर्भातील कामांकरिता तिन्ही कार्यालयात नेहमीच गर्दी दिसते. अद्यापही नागपूर विभागाला प्रादेशिक परिवहन अधिकारी पद मिळाले नाही.

Rohit Pawar : छगन भुजबळांंमागे अदृश्य हात? मराठा ओबीसी वादावर रोहित पवारांचे मोठे विधान

विशेष म्हणजे गडचिरोली आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा तर पूर्व नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे शहर आरटीओ कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आला होता. आता अमरावती आरटीओचे अधिकारी गीते यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून नागपूरला पूर्णवेळ आरटीओ मिळाले नाही. त्यामुळे दुय्यम अधिकाऱ्यांच्या भरोशावर नागपूर आरटीओचा कार्यभार सुरू आहे.

दोन विभाग, एक अधिकारी

नागपूर विभागात शहरासह ग्रामीण, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली असे सहा जिल्हे तसेच अमरावती विभागातील आरटीओ कार्यालयांतर्गत अमरावतीसह बुलढाणा, यवतमाळ, वाशीम व अकोला असे पाच जिल्हे आहेत. दोन्ही विभाग मिळून ११ जिल्हे आहेत. या अकराही जिल्ह्यांचा कार्यभार राजाभाऊ गीते या एकमेव अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या या अजब कारभारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply