Nagpur : नागपुरात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्यावर गुन्हा नोंद; प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ

Nagpur : तब्बल १११ ग्रॅम दागिने हडपून जातीवाचक शिवगीळ करून महिलेला धमकी दिल्याच्या आरोप प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज मोहन गोजे (वय ४२) आणि त्यांचे वडील मोहन श्यामराव गोजे (वय ६५) या दोघांविरूद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोजे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ४४ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महिला हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. म्हाळगीनगर येथे सूरज गोजे कुटुंबासह राहतात. २०२०मध्ये महिलेला मुलाच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची गरज होती. गोजे ओळखीचे असल्याने महिलेने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. दरम्यान महिलेने १११.५ ग्रॅम दागिने गोजे यांच्याकडे गहाण ठेवले. मोहन गोजे यांनी महिलेला दोन लाख ४० हजार रुपये रोख व उर्वरित ६० हजार रुपये ऑनलाइन दिले.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेतील जागावाटप जवळपास निश्चित; 207 जागांवर सहमती, कोणाला किती जागा मिळणार?

गोजे यांनी व्याजाने पैसे दिल्याचा लिखित करारनामा केला. डिसेंबर २०२४मध्ये महिलेने गोजे यांना एक लाख ९० हजार रुपये परत केले. त्यानंतर उर्वरित रक्कम व्याजासह परत करून महिलेच्या पतीने गोजे यांना दागिने परत मागितले. त्यांनी ही रक्कम घेतली नाही. दागिनेही परत करण्यास नकार दिला. त्यानंतरही वेळोवेळी महिला व तिच्या पतीने पैसे घेऊन दागिने परत करण्याची विनंती गोजे यांना केली.

जुलै महिन्यात गोजे यांनी महिलेच्या पतीला जागनाथ बुधवारीतील कार्यालयात बोलाविले. यावेळी सूरज गोजेही कार्यालयात होते. त्यांनी महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ केली. तारण ठेवलेले दागिने परत करण्यास नकार दिला. "मी शिवसेनचा जिल्हा प्रमुख आहे. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाही", असेही सूरज गोजे महिलेच्या पतीला म्हणाले.

महिलेने हुडकेश्वर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी सूरज गोजे आणि त्यांच्या वडिलांविरूद्ध फसवणूक, अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा , महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *