Nagpur : मोठी बातमी! लाडकी बहिण योजना: महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा प्रस्ताव, एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती

Nagpur :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेवरुन विधीमंडळात जोरदार घमासान होताना बघायला मिळालं आहे. राज्य विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जातोय. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये आर्थिक मदत देण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. पण अद्याप तशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

"लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना घरी बसवलं आहे. त्यामुळे आम्ही जी लाडकी बहीण योजना सुरु केली ती कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोललो, दर महिन्याला लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णयही आम्ही घेऊ. ते आश्वासनही आम्ही पूर्ण करु", असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Pune : पुण्यातील ट्रॅव्हल एजन्सींसाठी महत्त्वाची अपडेट; ग्राहकांकडून पैसे घेताना आता ‘या’ नियमांचं काटेकोर पालन अनिवार्य

"लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरु करत होतो तेव्हा हेच लोकं ही योजना बंद पडावी यासाठी कोर्टात गेले होते. याच लोकांनी नागपूरच्या कोर्टात धाव घेतली होती. ते महाविकास आघाडीचेच लोकं होती. पण आम्ही लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना कायम सुरु राहणार हेही मी सांगतो. आम्ही जे 2100 रुपये बोललो आहोत, योग्यवेळी आम्ही त्यांची पूर्तता करणार", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *