
Nagpur : राज्याची उपराजधानी नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांकडून या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली. "फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर आपण तपासासाठी एसआयटी नियुक्त केली. यासंदर्भात न्यायालयीन चौकशीही सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, महिला डॉक्टरने हातावर जे लिहिलं आहे ते तिचंच हस्ताक्षर असल्याचं निष्पन्न झालं आहे," असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहीत जीवन संपवल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनादरम्यान या घटनेच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. "या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने याने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि तिचे शारीरिक शोषण केलं. लग्नाचं आमिष दाखवून नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली," असं तपासात समोर आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
|
|
या प्रकरणाच्या तपासविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "आत्महत्येमागे बदनेने केलेली फसवणूक आणि त्या परिस्थितीचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीनेही फसवणूक केली. या दोघांची नावे लिहून तिने आत्महत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार, गळफास लावून आत्महत्या झाली असून, हातावरचे अक्षर महिलेचेच आहे. तपास अजून संपलेला नाही आणि चार्जशीट लवकरच दाखल होईल. समांतरपणे अनेक गोष्टींची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू आहे," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, "डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. व्हॉट्सॲप चॅट मिळाले आहेत. शेवटच्या दिवशी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या, रूममध्ये गेल्या याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत. कोण आले, कोण गेले याचीही माहिती आहे. नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. काही गोष्टींची पडताळणी केली जात आहे. ६० दिवसांत चार्जशीट दाखल केली जाते, तीदेखील अंतिम टप्प्यात आहे. आरोपींव्यतिरिक्त अजून कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याची माहिती मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे," अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

