Nagpur Lok Sabha : निवडणूक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Nagpur Lok Sabha :  नागपूरमधून एक मोठी समोर आली आहे. काँग्रेसने भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. निवडणुक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसच्या वतीने दाखक करण्यात आली आहे.

काँग्रेने आरोप केला आहे की, १ एप्रिल रोजी भर दुपारी तळपत्या उन्हात वैशाली नगर परिसरात विद्यार्थ्यांना प्रचारासाठी हातात झेंडे बॅनर देऊन उभं केलं होतं. हे सगळे विद्याथी नागपूरच्या एनएसव्हीएम शेळतील आहेत. यामुळे नितीन गडकरी आणि भाजपाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यातील काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे ही लेखी तक्रार दाखल केली आहे.

Nashik Accident News धानोरे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन मुली जखमी

निवडणूक आयोगात केलेल्या आपल्या तक्रारीत अतुल लोंढे म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी मी लिहित आहे. माझ्या निदर्शनास आले आहे की, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी निवडणुकीने ठरवून दिलेल्या नियमांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत आहेत.''  

लोंढे म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असूनही निवडणूक विषयक कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेण्यास मनाई असूनही, भाजप आणि नितीन गडकरी हे त्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करत आहेत.''

तक्रारीत लोंढे पुढे म्हणाले, ''एनएसव्हीएम फुलवारी शाळेतील शाळकरी मुलांचा उपयोग भाजप आणि त्याचे उमेदवार नितीन गडकरी यांनी १ एप्रिल रोजी वैशाली नगर येथे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान झालेल्या प्रचारसभेसाठी केला होता. कायदा आणि नैतिक मानकांबद्दलची ही स्पष्ट अवहेलना गंभीर आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.'' असं म्हणत त्यांनी नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई करावी अशी, मागणी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply