Nagpur DCC Bank Scam : नागपूर जिल्हा बँक घोटाळा; खात्यांतर्गत चौकशीला सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ

Nagpur DCC Bank Scam : नागपूर सहकारी मध्यवर्ती जिल्हा बँकेत झालेल्या अपहार झाल्याची तक्रार होती. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला आता ५ वर्षे ३ महिन्यांचा कालावधी झाला आहे. आता संबंधित प्रकरणात उलट तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. ही मुदत ५ मे २०२४ पर्यंत वाढविली आहे. 

राज्याचे माजी पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  सुनील केदार१९९९ साली नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष होते. बँकेच्या रकमेतून २००१-०२ या वर्षी होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आल्याचे आरोप होते. जवळपास १५२ कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल विभागीय सहनिबंधक  नागपूर यांच्या मार्फत १६ जून ला देण्यात आला. मात्र त्याची फेरचौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सरकारने दिले.

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई, अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त

सहा महिन्याची मुदतवाढ 

या प्रकरणाचा खटला सुरु असून अखेर सरकारकडून मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या खात्यांतर्गत चौकशीला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२३ ते ५ मे २०२४ अशी सहा महिन्यांसाठी बँकेच्या अंतर्गत समितीला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply