Nagpur Crime : दुकानामध्ये घुसून जीवघेणा हल्ला, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूरमध्ये खळबळ


Nagpur :  नागपूरमध्ये बाप-लेकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. नागपूरच्या रामटेके नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे. दुकानामध्ये असताना या दोघांवार जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. नागपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

 

नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना दोन जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शताब्दी चौक ते बेसा दरम्यान रामटेके नगर येथे वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. बाप-लेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशनात विदर्भाकडे दुर्लक्ष, विदर्भातील जनतेला न्याय मिळाला का? विरोधक संतापले

विजय सावरकर आणि मयूर सावरकर असं या बापलेकांची नावं आहेत. विजय सावरकर यांचे रामटेकनगरमध्ये घराजवळच फर्निचरचे दुकान असून शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या दुकानात चार ते पाच हल्लेखोर आले होते. जुन्या वादातून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान विजय सावरकर यांचा मुलगा वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये आला तर त्याच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये विजय सावकर आणि मयूर सावरकर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply