Nagpur Company Blast : नागपुरातील खासगी कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; एकाचा जागीच मृत्यू, ७ कामगार जखमी

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात सिमेंट विटा बनवण्याच्या कंपनीत आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की आसपासच्या परिसराला हादरे बसले. या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झालाय. तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत.

नंदकिशोर करंडे असं मृत कामगाराचं नाव आहे. स्फोटात जखमी झालेल्या इतर कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय.

Bangladesh Clashes : शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेश सोडून भारतात; बॉर्डरवर BSF अलर्ट

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील  झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत सिमेंट तसेच विटा बनवण्याचे काम केले जाते.

सोमवारी रात्री कंपनीत विटा बनवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही कामगार रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. दरम्यान, आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंपनीत काम सुरु असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला.

या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की कंपनीचे छप्पर उडून आसपासच्य परिसराला हादरे बसले. कानठळ्या बसणारा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. स्फोटानंतर कंपनीला आग लागली होती.

स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास केला जातोय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply