Nagpur Blast : नागपूरमध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, 6 महिलांसह 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Nagpur Blast : नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. 9 कर्मचाऱ्यांच्या या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

Parbhani Accident : परभणीत भीषण अपघात! ट्रॅक्टर आणि क्रुझरची समोरासमोर धडक; ३ जणांचा मृत्यू, ५ जखमी

बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.  

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *