Nagpur News : नागपूर मविआमध्ये बिघाडी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरांचा प्रचार

Nagpur  : बऱ्यचशा मतदारसंघात बंडखोरी झाल्याने पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करण्याचे सांगितले जात आहे. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत. 

नागपूरच्या रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र तरीही काँग्रेसचे नेते पूर्ण शक्तीने बंडखोर उमेदवाराचा प्रचार करत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मत मागत असल्याचे दिसून येत आहे.

Akola : अकोल्यात ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर उमेदवाराला वंचितचा बिनशर्त पाठिंबा

दरम्यान आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागताना दिसले. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात झाली आहे का? असे चित्र या प्रचार सभेमुळे दिसून येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply