
Nagpur : रुग्णालयात नेत्र तपासणीसाठी जात असताना पती- पत्नीवर काळाने झडप घातली आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या छोट्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सावनेर-काटोल मार्गावरील तेलकामठी शिवारातील वळण रस्त्यावर घडली आहे.
नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील नांदिखेडा येथील राजकुमार जंगलू कुंभारे (वय ५०) व इंदू राजकुमार कुंभारे (वय ४७) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सदर अपघात ८ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. कुंभारे दाम्पत्य डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सावनेर येथे रुग्णालयात जात होते. गावापासून काही अंतरावर असलेल्या तेलकामठी शिवारातील वळण रस्त्यावर भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला.
भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दिली धडक
कुंभारे दाम्पत्य दुचाकीने जात असताना सावनेरहून काटोलकडे विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दोघेजण रस्त्यावर फेकले गेले होते. यात गंभीर दुखापत झाल्याने राजकुमार कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी इंदुबाई या गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही तासातच त्यांचा देखील मृत्यू झाला.
वाहन चालक ताब्यात दरम्यान मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचा मालवाहू वाहनावरील ताबा सुटला. यानंतर ते वाहन रोडलगत उलटले. यात वाहनाचा चालक देखील किरकोळ जखमी झाला होता. उपचारानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र सावनेर- काटोल मार्गाचा काही भाग अरुंद आहे. दोन्ही बाजूंनी झुडपे असल्याने या मार्गावरील काही वळण धोकादायक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel
