Murlidhar Mohol Oath Ceremony : ताणलेली उत्सुकता आणि पहिलवान आला; मंत्री झाले मुरलीधर म्हणत कोथरूड मध्ये जल्लोष

Murlidhar Mohol Oath Ceremony :  नवनिर्वाचित खासदार मुरलीधर किसन मोहोळ यांनी केंद्रिय राज्यमंत्री म्हणून शपथ घेताच कोथरूड मध्ये कर्वे पुतळा चौक व मोहोळ यांच्या कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मोहोळ यांचे छायाचित्र असलेल्या भगव्या रंगाच्या फुग्यांनी कार्यालयाची दर्शनी बाजू सजवली होती. मोठ्या स्क्रीनवर शपथविधी पाहण्याची सोय करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेत असताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मोदी, मोदी, भारत माता की जय अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. भाग्यश्री बँडच्या तालावर, भाजपाचा झेंडा लहरवत मोठा जल्लोष सुरू झाला. दिवसभर कार्यालयात मिठाई वाटप करण्यात आले.

Modi 3.0 Cabinet : एनडीएच्या मंत्रिमंडळात कोण-कोण घेणार शपथ; महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांची लागली वर्णी, यादी आली समोर

मोहोळ यांच्या आई वेणुबाई, पत्नी मोनिका मोहोळ, मुलगी सिध्दी, सौम्या, मित्रमंडळी प्रत्यक्ष शपथविधी सोहळा पाहण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. आयुष्यभर जे कष्ट केले त्याचे चीज झाले. भाऊजी मला आई म्हणूनच आवाज देतात. कोरोना काळात लोकांची सेवा करताना दोन वेळा कोरोना झाला तरी ते स्वस्थ बसले नाहीत. खुप खुप आनंद झाला आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply