मुंबईची चिंता वाढली! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळं मुंबईकरांची चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये आज नव्या कोरोना रुग्णसंख्येने तीनशेचा टप्पा पार केला आहे.

आज दिवसभरात ३५२ नवे कोरोन रुग्ण (corona new patients) आढळल्याने नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या २०० च्या आसपास होती. मात्र, आज नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) वाढत असल्याचं चित्र निर्माण आहे. दरम्यान, आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १९,५६६ वर स्थिरावली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज शुक्रवारी नव्या ३५२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १,०६४,२७३

पोहोचली आहे. दरम्यान, आज २१३ रुग्ण हे लक्षणविरहीत आढळले आहेत. तर आज एकूण १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसंच मुंबईतील २१३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,०४२,९१० एवढी झाली आहे. मुंबईतली बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा दर ३२९६ दिवसांवर गेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply