Mumbai Weather : मुंबई गारठली, येत्या तीन दिवसांत राज्यातील तापमानात होणार आणखी घट

Mumbai Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र शीत लहर दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी मुंबईत थंडीचा पारा हा 15 अंश खाली गेला तर ठाण्यामध्ये 16.2 अंश इतका होता.

वाढलेल्या थंडीमुळे सर्वत्र धुक्यांची चादर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक वाढत्या थंडीसोबतच धुक्यांचा देखील आनंद लुटत आहेत.त्यातच हिमालयतील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस मुंबईतील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे तसेच प्रामुख्याने मुंबईचे देखील तापमान आणखी उतरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बदलेल्या हवामानामुळे मुंबईतील तापमानात घट झाल्याने हवेचा दर्जा देखील खालावला आहे. मुंबईतील थंडीबरोबरच इतर राज्यातही गारवा कायम आहे. धुळ्यात थंडीचा जोर अद्याप कायम असून नागरिकांना देखील हुडहुडी भरली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply