Mumbai Weather : मुंबई रात्रीही घामाघूम; मुंबईकरांना बसताहेत दिवसरात्र उष्णतेच्या झळा, कारण काय?

Mumbai Weather : मे महिना अजून दूर आहे. मात्र . महाराष्ट्रात कधी नव्हे ते आता फेब्रुवारीतच रात्रीचे तापमान वाढत आहे. थकलेल्या मानवी शरीराला रात्रीचा शीतल गारवा काहीसा आराम देत असतो. मात्र रात्रीचेही तापमान वाढू लागल्याने नागरिक बैचेन झालेत. उष्ण दिवस आणि तेवढीच रात्रीची उष्णता यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

युरोपीय युनियनच्या ताज्या अहवालानुसार पृथ्वी एक लाख वर्षात नव्हती एवढी उष्ण बनली आहे. भारतात सलग तिसऱ्या वर्षी तीव्र उष्ण लाट निर्माण झाली होती. अनेक शहरांमधील रात्रीचे तापमानही ३० अंशाच्या वर गेले होते. भविष्यात सगळ्यात जास्त धोका असले तो मुंबईला. शहर नियोजनाबाबत जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईकरांचा श्वास कोंडेल अशी भीती व्यक्त होतेय.

Satara News : डोक्याला गंभीर इजा, छातीला जोरदार मार, महाराष्ट्रातील लेकीचा अमेरिकेत अपघात; आई-बापाची पोरीला बघण्यासाठी घालमेल

वाढत्या तापमानात नगर नियोजन महत्वाचं,असं पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण म्हणाले. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास विज्ञान व पर्यावरण केंद्राने केला. त्यानुसार देशातील 17 राज्यांनी एक मार्च ते पंचवीस जून 2024 या काळात उष्ण रात्री अनुभवल्या. छत्तीसगड, गुजरात , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मार्चमध्येत उष्णतेची रात्र सुरु झाली. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दिवसांपेक्षाही रात्रीचे तापमान अधिक वेगाने वाढू लागले आहे.

या तापमान वाढीचा परिणाम थेट आता लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. कार्यक्षमता कमी होण्याबरोबरच विविध विकारही डोकं वर काढतील. मुंबईतील लोकसंख्येची घनता, फसलेले शहर नियोजन , नाहीसा होत असलेला हरित पट्टा आण हवेतील आद्रतेमुळे या वाढत्या तापमानाचा परिणाम मुंबईकरांना अधिक सहन करावा लागेल यामुळे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply