Mumbai University Senate elections schedule : रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लवकरच होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

Mumbai University Senate elections schedule : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागच्या वर्षभरापासून रखडली होती. ही निवडणूक आता लवकरच होणार आहे. या सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती आहे. 21 एप्रिलला मतदान होईल. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. आजपासून नव्या मतदारांची नोंदणी सुरु झाली आहे. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या महिनाभराच्या काळात नव्या मतदारांची नोंदणी पार पडेल. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

मागच्या महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र काही लोकांच्या हस्तक्षेपांमुळे हा वाद कोर्टात गेला. त्यानंतर सिनेट निवडणुकीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी. त्यासाठी विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Yavatmal News : यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी तर मुख्यमंत्र्यांना विरोध होण्याची शक्यता

सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक

आजपासून मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचं वार पाहायला मिळेल. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात मतदारांनी नोंदणी होईल. 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024 या काळात मतदार अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 26 फेब्रुवारी 2024 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

29 फेब्रुवारी ला या सिनेट निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. 11 मार्च 2024 पर्यंत इच्छुकांना या निवडणुकीसाठी अर्ज करता येईल. 11 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 18 मार्च 2024 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 20 मार्च या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 21 एप्रिल 2024 या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. 24 एप्रिल 2024 या दिवशी मतमोजणी पार पडेल आणि निकाल सर्वांसमोर असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply