Mumbai Traffic : मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या ४ किमी पर्यंत रांगा

Mumbai Traffic News : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ठाणे आणि मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा करावा लागत आहे. सोमवारी सकाळी कामावर जाणारे वाहतूक कोंडीत फसल्याचे पाहायला मिळाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे ते मुलुंड - ऐरोली मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मागील दोन तासांपासून वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सिग्नल यंत्रणा आणि वाहन बंद पडल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडली आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभागाची नाचक्की झाल्याचे चित्र आहे.

तीन किमी वाहनाच्या रांगा, मोठी वाहतूक कोंडी -

पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर भांडूप ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे दीड ते दोन किमी वाहनांचा रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूक कोंडीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र यामुळे कामासाठी मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्याना अर्धा ते एक तास इथे खोळंबा होताना पाहायला मिळतो आहे. या मार्गावर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान एक रेती वाहून नेणारा डंपर , कचरा वाहून नेणाऱ्या क्लीन अप ट्रक ला धडकला. यामुळे हा ट्रक रस्त्यात उलटला.यात रामावतार प्रजापती या ट्रक चालकाचा मृत्यू झाला.वाहतूक पोलिसांनी ही अपघात ग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केली असली तरी यामुळे झालेली वाहतूक कोंडी वाढत गेली आणि ती अजून ही पूर्व द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहे.

ठाण्यातही मोठी वाहतूक कोंडी -

सोमवारी सकाळ पासूनच ठाण्यातून मुंबईचा दिशेने जाणाऱ्या वाहन धारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुलुंड येथून ठाण्याच्या दिशेने येत असतानाच मेट्रोचे काम सुरू असतानाच सिग्नल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आता कोंडी फोडण्याचे काम सुरू आहे. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply