Mumbai Threat Call : लोकलमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आला फोन, मुंबईत एकच खळबळ

Mumbai Threat Call : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडालीये. हा फोन आज सकाळी आला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळी हा फोन आला असून फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं.

अधिक माहिती अशी की, यावेळी महिला पोलिस शिपायानं संबंधित व्यक्तीकडून अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. त्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, त्यानं तो जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगत फोन कट केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता. 

Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत कायम, अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी 15 वाहनांची तोडफोड

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply