Mumbai : देशातील सर्वात लांब सागरी सेतूला हिरवा कंदील; पहिल्या टप्प्याला मंजुरी, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल

Mumbai : मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडवणाऱ्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्तन–विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली असून, याच आधारावर 120 किमी लांबीच्या प्रस्तावित कॉरिडोरचा मोठा पाया रचला जाणार आहे.

एमएमआरडिएने एक्स वर सांगितले की हा नवा कॉरिडॉर “मुंबई कशी धावते तेच बदलून टाकेल.” दक्षिण मुंबईला वसई, विरार, पालघर आणि नवीन बांधण्यात येत असलेल्या वाढवण बंदराशी दृतगती महामार्गाने जोडले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई–वाढवण दृतगती मार्गाचा ( MVEC ) चा मार्ग मोकळा झाला आहे. हा कॉरिडॉर सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू आणि दृतगती मार्गा यांना एकत्र जोडून वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणार आहे.

Mumbai : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी ५०० कोटींची निधीमंजुरी, प्रवाशांच्या अडचणींना दिलासा

पीटीआयच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्याचा खर्च 58,754.71 कोटी रुपये इतका असून प्रकल्पाला पूर्ण होयला 60 महिने लागणार आहेत. हा प्रकल्प MMRDA मार्फत राबवला जाईल आणि नंतर वाढवण बंदरापर्यंत विस्तारला जाईल. या कॉरिडॉरचे मुख्य आकर्षण म्हणजे 24.35 किमी लांबीची उत्तन–विरार सागरी सेतू जो भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. यासोबत 30.77 किमीच्या जोडरस्त्यांसह या टप्प्याची एकूण लांबी 55.12 किमी असेल.

सरकारी ठरावानुसार, राज्य सरकार 11,116.27 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद (व्याजमुक्त), ज्यात कर, जमीन संपादन आणि पुनर्वसनाचा खर्च समाविष्ट आहे, उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित निधी MMRDA च्या हिस्स्यातून आणि बाह्य कर्जांमधून उभारला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी म्हटले होते की वाढवण बंदराचा विस्तार मुंबईतील उत्तर-दक्षिण जोडणी सुधारेल आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करेल.

त्यांनी हेही नमूद केले की वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवर आधीच क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक असते त्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक क्रांतीचा भाग बनणार आहे. यामध्ये सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, अटल सेतू, ऑरेंज गेट टनल, वर्सोवा–वांद्रे सी लिंक, नॉर्थ कोस्टल रोड, दिल्ली–मुंबई एक्स्प्रेसवे आणि शिवडी-वर्ळी उड्डाणपुलाचा समावेश आहे. MMRDA ने म्हटले की MVEC म्हणजे नवा किनारा, नवा कॉरिडॉर आणि नव्या संधींची लाट आहे, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विकासाच्या पुढील टप्प्याला सुरुवात होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *