Mumbai : कांदिवलीत शाळेत अजान लावण्याचा प्रयत्न, पालक-शिवसैनिकांच्या संतापानंतर शाळेचा मोठा निर्णय

Mumbai : वाशी येथील एका शाळेत जय श्रीराम च्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये अजान लावल्यामुळं वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना नमाज कसे पढायचे हे शिकवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पालकांच्या विरोधानंतर शाळेनं माफी मागितली आहे. 

गेल्या काही दिवासांपासून राज्यात जाती धर्मावरुन वाद सुरु आहे. अशातच मुंबई येथील कपोल विद्यानिधी शाळा धार्मिक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. शिवसेनेकडून शाळेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पालक आक्रमक, गरज काय अजान लावण्याची

शाळेच्या या भूमिकेनंतर पालक आक्रमक झाले आहेत. अजान लावण्याची गरज काय? अशी विचारणा पालक करत आहेत. हनुमान चालिसा का लावली नाही असही पालक विचारत आहेत.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या शाळेवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. या संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply