Mumbai Rains: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, CM शिंदेंनी केले आवाहन !

Mumbai :  देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने (IMD) 8 जुलैसाठी मध्य महाराष्ट्रातील काही भागात अॅऑरेंज अलर्ट जारी केला आहे

रविवार रात्री 1 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत केवळ 6 तासांतच मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सोमवारी देखील शहराला पावसापासून फारशी विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) हद्दीत सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रथम सत्राची सुट्टी घोषित करण्यात आली आहे. स्थितीचे पुनरावलोकन केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. अनेक निचले भाग जलमय झाले असून उपनगरीय रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे.

Arun Gawli : 'डॅडी'च्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ! डॉन अरुण गवळीवरील मोक्का कारवाईची फाईल सापडेना; गुन्हे शाखेची माहिती

रेल्वेसेवा बाधित, नागरिकाना सतर्कतेचा इशारा-

 मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रवल सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे

समुद्रात भरती आणि शाळांना सुट्टी-

मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

पावसामुळे लांच पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले-

महाराष्ट्रातील कल्याण आणि कसारा स्टेशनदरम्यान झालेल्या पावसामुळे जलभराव झाल्याने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे आणि काही गाड्यांचे प्रवास मार्ग कमी करण्यात आले आहेत. गथ्य रेल्वेच्या (सीआर) अधिकायांनी ही माहिती दिली, अधिकान्यांनी सांगितले की, कल्याण आणि कसारा स्टेशनदरम्यान झालेल्या अडथळ्यानंतर वाहतूक मर्यादित रातीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply