
Mumbai Rain News : मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईत कालपासून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील सकाळपासूनच मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू झालीये. मुंबईसह अंधेरी जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली, बोरिवली या उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागांत देखील पाणी साचण्यास सुरूवात झालीये.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पश्चिम बंगालच्या सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा विदर्भ या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.
|
|
मागील अर्धा तासांपासून सबवे वाहतुकीसाठी बंद
मुंबई उपनगरात मागील पाऊण तासापासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे उपनगरातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे जलमय झाला आहे. अंधेरी सबवेत तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे आज सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि मुंबई वाहतूक पोलीस या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः उभे राहून नागरिक आणि वाहन चालकांना सबवेतून जाण्यास मनाई करत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. काल देखील मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तासभर बंद करण्यात आला होता.
मुंबईकरांची वर्ष भराची पाण्याची चिंता मिटली
मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज सकाळ मुंबईत पाणी पुरवठा करणारे मध्य वैतरणा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकसागर हे दुसरे धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. या धरणाचे दोन स्वयम चलित दरवाजे उघडण्यात आले असून या मधून 13867 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाडा, पालघर, वसई, तालुक्यातील नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

