Mumbai Rain : मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

Mumbai Rain : मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. आता मुंबईत देखील पूर्वमोसमी पाऊस लवकरच हजेरी लावणार असल्याचं दिसत आहे. कारण हवामान विभागाने आज मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसंच मुंबईत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आज मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामान खात्याने शहरामध्ये आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला  आहे. पुढील २४ तासांमध्ये कमाल तापमान ३४ तर किमान २९ अंश सेल्सिअस राहील असं सांगण्यात येत आहे. यासोबतच पर्यटकांसाठी देखील मोठी बातमी आहे. आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढील तीन महिने बंद असणार आहे.

Pune Car Accident : फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर

कोकणात मान्सूनचे आगमन १० जूनपर्यंत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मासेमारीसाठी देखील आता बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यात १० जूनच्या दरम्यान मान्सूनचं आगमन पाहायला मिळणार आहे. सांगली, सोलापूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तेथे वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे, घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
 
मुंबईमध्येदेखील आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण दिसत आहे. तर उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबई लवकच गारेगार होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. यंदा मुंबईमध्ये उन्हाळा जास्तच कडक होता. उष्णतेची लाट देखील मुंबईत पाहायला मिळाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply