Mumbai Rain : लोकलसाठी रेल्वे स्थानकात तुफान गर्दी! मुख्यमंत्र्यांनी बेस्ट, एसटीला दिले 'हे' आदेश

Mumbai Rain : मुंबईत दिवसभरातील मुसळधार पावसामुळं अनेक लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत. पण सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा आता घरी परतताना मोठा खोळंबा झाला आहे.

यामुळं महत्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. यापार्श्वभूमीवर बेस्ट आणि एसटी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी शहरातील परिस्थितीबाबत चर्चा केली तसेच कन्ट्रोल रुममध्ये जाऊन शहरातील सर्व भागातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये कुठल्याही भागात आता पाणी साचलेलं नाही ट्राफिकही सुरळीत सुरु असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Konkan Rain: कोकणात अतिवृष्टी, परशुराम घाटात दरड कोसळली, प्रशासनाकडून २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना

रेल्वे स्थानकांत तुफान गर्दी

पावसामुळं लोकल ट्रेन रद्द झाल्यानं मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर, ठाणे आदी विविध रेल्वे स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गर्दी झालेल्या रेल्वे स्थानकांबाहेरुन बेस्टच्या बसेस आणि एसटीच्या बसेस सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply