Mumbai-Pune Highway Bus Accident : खोल दरीतून जखमींना अक्षरश: खांद्यावर उचलून आणलं; बचाव पथकाचा थरारक अनुभव

Mumbai-Pune Highway Bus Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातीची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमचा घटनास्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही खडतर होता. बचाव पथकातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना अपघाताची माहिती मिळाली. 108 नंबरवरुन त्यांना अपघाताची माहिती मिळाली होती.

त्यानंतर तत्काळ एका टीमने संपूर्ण घाटात फेरफटका मारला. मात्र घाटात कुठेही बस पडलेली आढळली नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा कॉलरशी संपर्क साधला आणि त्याला लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची विनंती केली. कॉलरने लाईव्ह लोकेशन शेअर केल्यानंतर अपघातग्रस्त जागा कन्फर्म झाली, अशी माहिती बचाव पथकातील सदस्यांनी दिली.

बस ज्याठिकाणाहून दरीत कोसळली याचा अंदाज आम्हाला आला. दोन महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी एक अपघात झाला होता. त्यामुळे खाली दरीत कसं पोहोचायचं याची आम्हाला माहिती होता. मात्र पहाटेच्या अंधारात अपघातग्रस्त बस शोधण्याचं आव्हान आमच्यासमोर होते. त्यामुळे मागील अपघातावेळी जे पोलिस कॉन्स्टेबल आमच्यासोबत होते त्यांना आम्ही आधी खाली पाठवलं. त्यानंतर आम्हीही तिथे पोहोचलो आणि रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलवलं ,अशी माहिती त्यांनी दिली. 

सरकारी मदत येण्याआधी आम्ही काही जखमींना अक्षरश: खांद्यावर उचलून वर आणलं. शिवदूर्ग टीम, मावळ रेस्क्यू टीम, यशवंत हायकर्स, देवदूत टीम, आरटीओ कर्मचारी, वाहतूक पोलीस आम्ही सर्वांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं आहे, अशी माहिती बचाव पथकातील सदस्यांनी दिली.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 28 जण जखमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याचा कार्यक्रम संपवून माघारी येत असताना हा अपघात झाला.

अपघातील एकूण 13 पैकी 12 मृतांची ओळख पटली आहे. तर एकाची ओखळ पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मृतांची नाव

  1. जुई दिपक सावंत (वय 15 वर्ष रा. गोरेगाव)

  2. यश सुभाष यादव (वय 18 वर्ष रा. मुंबई)

  3. स्वप्निल धुमाळ (वय 18 ते 20 रा. मुंबई)

  4. वीर कमलेश मांडवकर (वय 8 रा. गोरेगाव)

  5. वैभवी साबळे (वय 16 वर्ष रा. गोरेगाव)

  6. सतिष धुमाळ (वय 20 रा. गोरेगाव)

  7. मनिष राठोड (वय 23 रा. चेंबर)

  8. हर्षदा परदेशी (वय 19-20 रा. माहिम)

  9. अभय विजय साबळे (वय 20 वर्ष रा. मालाड)

  10. हरीरतन यादव (वय 40 वर्ष रा. जोगेश्वरी)

  11. कृतिक रोहित (गोरेगाव)

  12. राहुल गोठवळ (गोरेगाव)

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply