Mumbai-Pune Highway Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू, 27 जण जखमी

Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई  महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती राजगड महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती. बसमध्ये 41 जण प्रवास करत होते अशी माहितीही पोलीस अधीक्षकांना दिली आहे. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप, आयआरबी टीमला पाचारण करण्यात आलं आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी बोलवण्यात आलं आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply