Mumbai Pune Highway : लोणावळा शहरातून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी; पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Mumbai Pune Highway : लोणावळा शहरांमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड आणि अवजड वाहनांना आता कायमस्वरूपी बंदी करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आहेत.

लोणावळा  शहरातून जुना मुंबई- पुणे महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दरम्यान लोणावळा शहरामध्ये यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शिवाय अपघाताचे प्रमाण देखील मागील काही दिवसात वाढले आहेत. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी हा आदेश लागू करण्यात आला आहे. १४ जून रोजी याबाबतची अधीसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. 

अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

हा असेल मार्ग 

सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये सर्व प्रकारची जड अवजड वाहने लोणावळा शहरातून नेण्यास बंदी आहे. हि वाहने मनशक्ती येथून मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वळवण्यात येणार आहेत. तसेच खंडाळ्याच्या दिशेने येणारी सर्व जड अवजड वाहने यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply