Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत. विकेंडमुळे वाहन चालक आपल्या खासगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात आहे. लोणावळा ग्रामीण वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून लोणावळ्यात एकेरी वाहतूक सुरू आहे. कारण पावसाळा सुरू झाल्याने आता महाराष्ट्रभरातून अनेक पर्यटक हे लोणावळ्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. स्थानिकांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना देखील अर्धा वेळ वाहतूक कोंडीत काढावा लागतो.

Pune : बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरात उद्या वाहतूक बद

यावर्षी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांनी आता लोणावळ्यातील वाहतूक एकेरी केली आहे. संपूर्ण लोणावळा शहरात नगरपरिषदेच्या वतीने प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. एकेरी वाहतूक केल्याने आता पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आणि पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे विकेंड असल्यामुळे लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी मोठ्यासंख्येने येणारे पर्यटक. आता सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून पर्यटक परत जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहिशी मंदावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply