Mumbai Pune Expressway News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी दोन तासांचा ब्लॉक; कुठून जाल? पर्यायी मार्ग कोणता...

Pune Mumbai Expressway : शुक्रवारी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी उद्या द्रुतगती मार्गावर 12 ते 2 असा विशेष ब्लॉक घेतला जातोय. 

या दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील. हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली.

India Alliance News: इंडियाच्या बैठकीसाठी ग्रँड हयातमध्ये 80 टक्के रुम बूक; प्रत्येक रुमचं भाडं, जेवण, नाश्तासाठीही रग्गड खर्च

पर्यायी मार्ग कोणते?

मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिट जवळ गॅन्ट्री बसविण्यात येईल. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे. तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply