Mumbai-Pune Expressway Landslide: मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळली; पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या 2 लेन बंद

Mumbai-Pune Expressway Landslide: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रात्री सव्वा दहाच्या सुमारास दरड कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

Pune Fraud News : पुण्यातील प्रसिद्ध सांबार हॉटेलची फ्रेंचायजी देण्याचे आमिष; तब्बल ३० लाखांचा घातला गंडा.. पुण्यात खळबळ

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस आणि खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply