Mumbai Pune ExPressway : सलग सुट्ट्यांमुळे लगबग! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान वाहतुक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune ExPressway :  गणपती उत्सवाची सांगता झाल्याने शहराकडे आणि सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती उत्सवाचा सण आटोपून गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. तसेच सलग सुट्ट्यांमुळे शहरातील चाकरमानी गावाकडे येत आहेत.

त्यामुळे महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव घाटात ट्राफिक जाम झाले आहे. तसेच लोणावळ घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत,

Bus Fire On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; 32 प्रवासी थोडक्यात बचावले

सलग सुट्ट्यांमुळे लगबग...

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्ट्या सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर एक दिवस सुट्टी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवार (२ ऑक्टोंबर) महात्मा गांधींजींची जयंती असल्यामुळे सुट्टी असणार आहे. त्यामुळेच मुंबईकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असून त्यामुळेच महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply