Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ६ वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

Mumbai-Pune Expressway Acident : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आठवडाभरापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक्सप्रेस वेवर  सहा वाहनांना विचित्र अपघात झाला आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने खोपोलीजवळ तब्बल ५ वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. प्राथामिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहे. आठवडाभरापूर्वी एक्सप्रेस वेवरील बोरघाटात भरधाव वेगात जाणाऱ्या कारने आपल्यासमोर असलेल्या इतर वाहनांना जोरदार धडक दिली होती.

ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले होते. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply