Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा ब्लॉक; दुपारी १२ ते २' या वेळेत पुर्णतहा राहणार बंद

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका आज म्हणजेच गुरूवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत ही मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रविवारी (ता. २३) रात्री ११ वाजेच्या सुमारास ओडीसी बोगद्याच्या मागे दरड कोसळल्याची घटना घडली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दुसऱ्याच दिवशी सकाळी ३ तासांचा ब्लॉक घेऊन तातडीने दरड हटवली.

मात्र, त्यानंतरही या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी मार्गिका आज दुपारी १२ ते २ या वेळेत पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. येथील धोकादायक दरडी हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान चार चाकी हलक्या वाहनांना शिंग्रोबा घाटातील जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू राहणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तास अवजड वाहनांना घाटात प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचे बोरघाट महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक निरीक्षक योगेश भोसले यांनी सांगितले आहे.

Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

दरम्यान, गेल्यावेळी काम वेळेत न संपल्यामुळे ब्लॉक लांबला होता. आता उद्या तशीच परिस्थिती निर्माण होणार का, हे पाहावे लागेल. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सैल झालेल्या दरडी हटवण्याच्या कामात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या काळात पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांना जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा अत्यंत गजबलेला मार्ग आहे. दररोज या मार्गावरुन हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे उद्या ब्लॉक सुरु होण्यापूर्वी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढू शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply