Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहनं बाजूल काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण किरकोरळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Jalna News : लाठ्या-काठ्यांचा काळ गेला, उगाच गावाची शांतता बिघडवू नका; लक्ष्मण हाके संतापले

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना तात्काळ खोपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली आहे. त्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कारने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. स्वप्निल प्रदीप खरबडे असे मृत तरुणाचे नाव आहे. स्वप्निल भोसरीतील लांडेवाडीमध्ये राहत होता. आर्मी स्कूलच्या समोर ही अपघाताची घटना घडली होती. यामध्ये स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा योग्य तपास करावा यासाठी स्वप्निलच्या नातेवाईकांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply