Mumbai Police : मुंबई पोलीस ऑन ड्युटी २४ तास; २८ जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द

Mumbai Police : मुंबई पोलीसांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विविध कार्यक्रमांमुळे २८ जानेवारीपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्ऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्यात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २८ तारखेपर्यंत फक्त वैद्यकी सुट्टी घेऊ शकतात. गृह खात्याकडून पोलीस महासंचालनालयाला हे निर्देश देण्यात आले आहेत.

सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय. त्यामुळे राज्यात विविध धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी असणार आहे. मुंबईसह राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडूनये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. राम मंदिरामुळे अयोध्येसह मुंबईतील नागरिकांनी देखील मोठ्या जल्लोषात उत्सवाची तयारी केली आहे. अनेक शहरे दिवाळी असल्याप्रमाणे सजवली गेलीत.

Ram Mandir : पुण्यातील मराठी उद्योजकाला अयोध्येत पुढील १५ वर्षांसाठी सेवा देण्याची मिळाली संधी

राम मंदिर सोहळा पार पडल्यावर मुंबईत मराठा आरक्षणाच्या मगणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणारेत. मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होण्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २७ जानेवारीपर्यंत ते पोहचणार आहेत. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी केलं जाणारं आंदोलन शांततेत पार पडणं गरजेचं आहे.

मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडूनये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा लागणार आहे. त्यामुळे देखील २८ जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. पोलीस आयुक्तालये, गुप्तवार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षल विरोधी अभियान, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी सकाळी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये २० ते २८ जानेवारीपर्यंत कुणालाही सुट्टी घेता येणार नाही, असे कळविण्यात आले आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply