Mumbai : 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावरील ठाकरे गटाच्या शाखेवर हातोडा; मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

Mumbai : मुंबई महापालिकने शिवसेनेच्या ठाकरे गटाला दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केला आहे.

वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेचा मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा चालवला आहे. दोन बुलडोझरच्या साहाय्याने या शाखेवर महापालिकेने पाडकामाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. 

वांद्रे पूर्व परिसरात रेल्वे स्टेशनजवळ रिक्षा स्टँड आहे. त्याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरचं कार्यालय आहे. त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

वॉर्ड क्रमांक 96 चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान हे ह्या कार्यालयातून काम करतात. तसेच फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. ही शाखा ४० वर्ष जुनी आहे, असा ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र ही शाखा बेकायदेशीर असल्याने मुंबई महापालिकेने ही तोडक कारवाई हाती घेतली आहे.

घटनेची माहिती मिळतात परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कारवाईबाबत जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. अधिकारीही शांतपणे कार्यकर्त्यांना उत्तरे देताना दिसले.

मात्र या कारवाईमुळे शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या घटनेचे राजकीय पडसाद येत्या काळात उमटणार हे मात्र नक्की आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply