Mumbai News : मोबाइल का वापरते? वडिलांनी झापलं,म्हणून मुलीने घर सोडलं

Mumbai News : आई-बाप रागावल्यामुळे मुलांनी घरं सोडल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. असेच एक प्रकरण मुंबईतील अंधेरीमध्ये घडले. मोबाईल का वापरते? म्हणून पालक रागावल्यामुळे मुलीने घर सोडले. त्या अल्पवयीन मुलीने घर सोडताना आपल्या दोन मैत्रिंणींनाही सोबत नेलं. हे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. आजूबाजूला शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जवळचे पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल केली, अन् घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ४ तासांत तिन्ही मुलींचा शोध घेतला.

अंधेरी पूर्व भागात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुली घर सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली. याचं कारण म्हणजे सतत मोबाइल वापरते म्हणून वडिल रागवले. त्यानंतर संतापच्या भरात एका मुलीने घर सोडले आणि विशेष म्हणजे सोबत आपल्या वर्ग मैत्रिणींनाही सोबत घेऊन गेली.

या तीनही मुली फक्त 14 वर्षाच्या आहे,त्या सातवी कक्षात शिक्षण घेत आहेत. पालकांनी लगेचच नजीकच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून तपास सुरू केला.

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरामध्ये अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी, कसा कराल प्रवास?

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या सहाय्याने आणि प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आणि अवघ्या चार तासात या मुली दादर स्थानकावर सापडल्या त्या नंतर मुंबई पोलिसांनी या तीनही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले .

आज कालच्या डिजिटल युगात लहान मुलांना कमी वयातच मोबाइल दिला जात आहे. सुरुवातीला मनोरंजन आणि शिक्षणासाठी दिलेला मोबाइल हा त्यांची सवय बनत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे हल्लीच्या मुलांची सहनशक्ति कमी झाली आहे, त्यामुळे त्यांची शिल्लक कारणामुळे होणारी चीड चीड, संवाद कमी होणे,हट्टीपणा वाढणे या समस्या अनेक अल्पवयीन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये पाहायला मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply