Pune News 24

Follow us -
Follow us -
  1. मुख्य पान
  2. /
  3. Cities
  4. /
  5. Mumbai
  6. /
  7. Mumbai News : मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तासांपासून ठप्प

Mumbai News : मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकलसेवा विस्कळीत; कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तासांपासून ठप्प

Mumbai News :  शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सहा वाजेपासून कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. झाडं देखील कोसळली आहेत. याशिवाय वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने वीज पुरवठा देखील बंद झाला आहे. त्यामुळे वासिंद-कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूकदेखील ठप्प झाली आहे.

Pune News : पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दरम्यान, कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *