Mumbai : मोठी बातमी! मुंबई विमानतळावरून १० किलो सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई

Mumbai : मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कामगिरी केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल १० किलो सोन जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये कस्टम विभागाने ९.७६ किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत ६.७५ कोटी रुपये असल्याची माहिती (Mumbai News) मिळतेय. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

Pune Porsche Car Accident Case : विशाल अग्रवालवर तिसरा गुन्हा दाखल; पुणे गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

याप्रकरणी कस्टम विभागाने ८८ लाख रुपयांच्या किमतीचे परदेशी चलन देखील जप्त केल आहे. एकूण २० प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने ही कारवाई केलेली आहे. आता अटकेनंतर या चार आरोपींची सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. या सर्वावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी काही गुन्हेगार जाळ्यात सापडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

यापूर्वी मुंबई कस्टम विभागाने १० मे रोजी देखील मोठी कारवाई केली होती. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कस्टम विभागाने ७.४४ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं होतं. एकूण १८ प्रकरणांमध्ये ११.६२ किलो सोन जप्त  करण्यात आलं होतं. यामध्ये सोन्याचे दागिने, सोन्याची पूड , विटा आणि सोन्याचं मेण स्वरूपात सोन्याची तस्करी करण्यात येत होती.

याप्रकरणी कस्टम विभागाने सात प्रवाशांना अटक करून १२ लाख रूपयांची रोकड जप्त केली होती. गुदद्वार, अंतर्वस्त्र तसेच कपडे आणि बुटामध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात असल्याचं समोर आलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply