Mumbai News : २२ मुलींवर केला अत्याचार, नराधमाची या प्रकरणात झाली निर्दोष मुक्तता

Mumbai News : मुंबईसह वसई, नवी मुंबई आणि ठाण्यात २२ अल्पवयीन मुलींवर कथित बलात्कार, अपहरण आणि विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या रेहान कुरेशीची कोर्टाने एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने एका प्रकरणात रेहान कुरेशीची निर्दोष मुक्तता केली. रेहान कुरेशी इतर २१ खटल्यांमध्ये न्याायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणांचे खटले अद्याप चालू आहेत. रेहान सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

रेहान कुरेशीची ज्या प्रकरणात निर्दोष मुक्तात झाली याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, ॲड. नाजनीन खत्री यांनी आरोपी रेहान कुरेशीची बाजू मांडली होती. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नाजनीन खत्री यांनी युक्तीवाद केला की, 'आरोपीने कोणताही विनयभंग केलेला नाही. शरीराच्या अवयवांना स्पर्श देखील केला नाही.' पीपी ॲड. मालणकर यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एम.टाकळीकर यांनी आरोपी रेहान कुरेशीची निर्दोष मुक्तता केली. या एका प्रकरणात जरी त्याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी देखील इतर २१ प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Pune Accident News : ‘पोर्शे' कारच्या आरटीओ तपासणीत धक्कादायक माहिती उघड; अपघाताचे नवे धागेदारे हाती लागणार

हा मुलगा तोंड दाबून या मुलीला ओढत जवळच्या इमारतीमध्ये घेऊन गेला. याठिकाणी लाइट बंद होत्या. या मुलाने मुलीला इमारतीच्या पॅसेजमध्ये उभे राहून बेडशीटवाल्याची वाट पाहण्यास सांगितले. पाच मिनिटं घटनास्थळी वाट पाहिल्यानंतर मुलगी तिथून निघून घरी गेली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्याआईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

दरम्यान, रेहान कुरेशीने ठाणे, पालघर, नालासोपारा, मुंबई आणि इतर परिसरात गुन्हे केले आहेत. रेहान सुरुवातीला ९ ते १५ वयोगटातील मुलीचा पाठलाग करायचा. त्यानंतर मुलगी घरात गेल्यानंतर दार वाजवून तो मुलीला वडिलांनी बोलावल्याचे सांगून तिला निर्जनस्थळी न्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा. अशा प्रकारे त्याने अनेक मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात रेहान कुरेशी अटकेत असून तो सध्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरोधात २२ प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply