Mumbai News : नववीत शिकलेल्या युवकाचा बनावट नोटांचा छापखाना, पाेलिसांच्या धाडीत 2 लाखांच्या नाेटा जप्त

Mumbai News :  पैसे कमाविण्याचा शॉर्टकट मार्ग काढत नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील या युवकाने समाज माध्यमातून व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटांचा छापखाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले असून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार प्रफुल्ल पाटील हा घरच्यांपासून वेगळा एकटा राहत होता. नववी पर्यंत शिकलेल्या प्रफुल्ल याला पैशाची चणचण भासत असल्याने त्याने समाज माध्यमातून बनावट नोटा बनविण्याची माहिती घेतली.

T20 World Cup 2024: टी 20 वर्ल्ड कप सराव सामन्यांचं वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर, भारताची एकमेव मॅच कधी?

या माहितीच्या आधारे नोटा बनवण्यासाठी कॉटन पेपर, प्रिंटर, स्कॅनर आणि नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लास्टिकची पट्टी या साहित्यांची खरेदी केली. याद्वारे प्रफुल्लने 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या.

मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात देखील आणल्या होत्या. मात्र त्याच्या मार्फत वापरात येणाऱ्या नोटा बनावट असल्याचा संशय काही नागरिकांना आल्याने त्यांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत प्रफुल्ल पाटील याला पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोट बनविण्याचे साहित्य आणि 2 लाख 3 हजार किंमतीच्या बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात प्रफुल्ल पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply