Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश, १०४ किलो एमडी जप्त

Mumbai News : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. २०२३ मध्ये जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी ही कामगिरी बजावली आहे. साकीनाका पोलिसांनी जोधपूरवरून या ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. या फॅक्टरीमधून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

जोधपूरच्या या ड्रग्स फॅक्टरीमधुन साकीनाका पोलिसांनी एकूण १०४ किलो एमडी जप्त केलं आहे. गोपनीय माहितीच्या आधाराव मोगरा खुर्द, जोधपूर, राजस्थानमध्ये गुहे शाखेने छापा टाकला. यावेळी ६७.५ किलो द्रव स्वरूपातील एमडी जप्त करण्यात आलं आहे. त्याची किंमत अंदाजे सुमारे १०१.१२५ कोटी रुपये आहे. तसेच १.५ कोटी रूपयाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं आहे.

Pune BJP Protest : पुण्यात मतदानादरम्यान भाजपचे आंदोलन, पदाधिकाऱ्यांचा भरचौकात ठिय्या

याप्रकरणी तिघांना मुंबईपोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये साकीनाका पोलिसांनी १.४ कोटी रुपयांचे एम जप्त केलं होतं. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान १.४० कोटी रुपयांचं एमडी जप्त करण्यात आलं होतं. त्या प्रकरणाचा मागोवा घेत असताना एमडी फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले होते. त्याप्रकरणी कारवाई करताना या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे.

साकिनाका पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांनी जोधपूरवरून ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. या फॅक्टरीमध्ये पोलिसांना सुमारे १०४ किलो अमली पदार्थ हाती लागले आहेत. मागील दोन महिन्याच्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातून पोलिसांनी २७ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. पुण्यातून देखील मोठे ड्रग्स रॅकेट समोर आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply