Mumbai News : मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Mumbai News : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे.

नौशाद शाह आणि अली सय्यद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून १००, २००, ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Patra Chawl Scam : संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यभरात बेनामी रोकड सापडण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अशातच बीकेसी येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याठिकाणी धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. सध्या पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या बनावट नोटा कुठे वितरीत केल्या जात होत्या, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply