Mumbai News : मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Mumbai News : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात विभागात विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू असल्याचं सांगणात येत आहे. यामधील 9 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर तीन जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. स्वप्निल डहाणूकर, मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती अस्थिर आहे, असं सांगण्यात येत आहे.

Pune Weather Update : पुणे कमाल तापले; कोरेगाव पार्क ४३.३, तळेगाव ढमढेरे ४३.४ अंशांवर

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर येथील गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ल्यामुळे एकूण बारा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सर्व विषबाधा झालेल्या व्यक्तींना गोरेगाव परिसरातील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भातली माहिती रुग्णालयातील डॉक्टर मिश्रा यांनी पोलिसांना कळवली आहे.

26 एप्रिल या दिवशी दहा जणांना वेजबादा झाल्याचं उघडकीस आलं. यानंतर 27 एप्रिल दिवशी अजून दोन जणांना त्रास जाणू लागल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करून यातील नऊ जणांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply