Mumbai : IIT, IIM मध्ये रात्रीचा दिवस करुन शिकला; मात्र, नोकरीला लागताच काही महिन्यांतच संपवलं जीवन

Mumbai : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कामाच्या प्रचंड दबावामुळे मुंबईत एका 25 वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कुमार लड्ढा, असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. 

सौरभ हा IIT, IIM ग्रॅज्युएट आहे. तो मॅकिन्से कंपनीत काम करत होता. सौरभने अमेरिकन सल्लागार आणि व्यावसायिक सेवा बेहेमथ मॅकिन्से अँड कंपनीसोबत देखील काम केलं आहे. सौरभवर कामाचा प्रचंड दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीत इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर, सौरभला कामावर घेण्यात आलं होतं. त्याला अहमदाबादमध्ये असाइनमेंट देण्यात आली होती. अहमदाबादवरून परतल्यानंतर सौरभने त्याच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. स्वतःची जीवयात्रा संपवली. सौरभ त्याच्या रूममेट्ससोबत राहत असल्याची माहिती मिळतेय.

Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यात होणार मतदार, २४ लाख ४६ हजार मतदार करतील मतदान

प्रतिष्ठित आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या सौरभने आयआयएम कलकत्ता या प्रमुख संस्थेतून एमबीए पूर्ण केले होते. पोलिसांनी सांगितले की, ते सौरभच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदाबाद प्रकल्पावर काम करणाऱ्या वरिष्ठांसह त्याच्या रूममेट्स आणि सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभच्या पश्चात त्याचे आई-वडील आहेत. त्याचे आईवडिल पुण्यात राहतात.

ही घटना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच या विषयावर ऑनलाइन चर्चा देखील सुरू झाली आहे. यापूर्वी या कंपनीत काम केलेल्या काही व्यक्तींनी तसंच ज्यांना संबंधित फर्मबद्दल ज्यांना माहिती (Mumbai News) आहे, अशा लोकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यापैकी अनेकजणांनी कंपनीतील वर्क कल्चरला चुकीचं म्हटलं आहे.

कंपनी यापूर्वी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. यात तिच्या कार्यपद्धतींची शुद्धता, यूएस सरकारच्या करारातून नफा मिळवण्यापासून, भ्रष्ट कॉर्पोरेशनला संरक्षण देण्याचा समावेश आहे. अलीकडेच मॅकिन्से आणि कंपनीवर जगभरातील हुकूमशाही राजवटींसोबत काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply