Mumbai News : अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक, ५५ लाखांचं कोकेन जप्त

Mumbai News :  अमली पदार्थ विक्री करताना एका नायजेरियन तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी हा नायजेरियन तरुण आला होता. वाकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अँथोनी मादुका न्वायझे (32 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 55 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या कोकोनची बाजारभावातील अंदाजे किंमत 55 लाख रुपये इतकी आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले...

आरोपीने आपण कोकेन विक्रीसाठी आणल्याचे तपासात कबूल केले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम 8 (क ) 21(ब) एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सध्या आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात असून त्याने हे कोकेन कुठून आणले आणि कुणाला देणार होता या सबंधात वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून सर्व पोलीस ठाण्यांना सर्च मोहीम आणि कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार मुंबईच्या वाकोला पोलिसांनी परिसरात अमली पदार्थ विक्रीचे स्पॉट आणि ठिकाणे सर्च करून आरोपींच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply