Mumbai : मुंबईतील मार्वे समुद्रात ५ मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू

Mumbai : मुंबईतील वांद्रे येथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना मालाडच्या मार्वे समुद्रात पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. तर तिघांचा शोध सुरू आहे.

मुंबईच्या मालाड मार्व समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. या मुलांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Teachers Recruitment: राज्यात लवकरच ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

कृष्णा जितेंद्र हरिजन (सोळा वर्षे ) आणि अंकुश भारत शिवरे (तेरा वर्ष ) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर शुभम राजकुमार जयस्वाल (बारा वर्ष), निखिल साजिद कायमकूर (तेरा वर्ष ), अजय जितेंद्र हरिजन (बारा वर्ष) ही तीन मुले बेपत्ता असून कोस्टगार्डचे जवान अग्निशमन दलाचे जवान महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे जवान समुद्रात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.

बँड स्टँड येथील समुद्रात महिला बुडाली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक महिला समुद्रात बुडाल्याची घटना घडली. महिला दगडावरून पाय घसरून समुद्रात बुडाली असल्याची माहिती पुढे आली होती. ज्योती सोनार (२७ वर्ष)असं समुद्रात बुडालेल्या महिलेचे नाव आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply