Mumbai : मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात नवीन 40 चारचाकी,184 दुचाकी समाविष्ट... गृहमंत्र्याकडून लोकार्पण

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी निर्भया पथक वाहनांचे लोकार्पण कार्यक्रम नरिमन पॉइंटला संपन्न झाला. उपमुख्यमंत्र्यांसोबत पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी लोकार्पण कार्यक्रमांत सहभागी होते.

मुंबई पोलीस दलातील निर्भया पथकात 184 दुचाकी आणि 40 चारचाकी गाड्या सामील झाल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्र्यांशिवाय मंत्री दिपक केसरकर, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुजाता सौनिक,अपर मुख्य सचिव (गृह) तसेच विवेक फणसळकर यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Pune Police : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन, पोलिस आयुक्तांची कारवाई

नवीन वाहने मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याने निर्भया पथक व बीट मार्शल अधिक सक्षम होणार आहे. मुंबई पोलीस दलातील सर्व वाहनांवर वेहिकल ट्रेकिंग सिस्टम (VTS) प्रणाली बसविण्यात आलेले आहे.

या प्रणालीमुळे सर्व वाहनांचे मुख्य व प्रादेशिक नियंत्रण कक्षातून मॉनेटरींग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. तसेच अधिकच्या वाहनांमुळे अधिक प्रभावीपणे गस्त घालून गुन्हयांना प्रतिबंध निर्माण होण्यास मदत होणार आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply